

अंतर्गत चाकण नगर परिषद , चाकण येथे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर मेळाव्यामध्ये माजी सैनिक अधिकारी आणि प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ञ डॉ.राजेंद्र मोरे यांनी स्वच्छतेचे काम करताना , सेवा देताना तणाव मुक्त जीवन कसे जगावे आणि स्वच्छतेचे काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
समाजाला विशाल दृष्टीकोण देऊन,आदर्श व्यक्ती घडवून,समाज-जीवनाची भावना बळकट करून आणि लोकांना आपले विचार व्यक्त करायला संधी देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग समाजात परिवर्तन घडवून आणते. यानुसार आयुष्यामध्ये क्षमता बांधणी करण्यासाठी हे चार महत्वाचे घटक Need assessment, design, implementation and monitoring हे अतिशय महत्त्वाचे आहे याशिवाय आपल्या जीवनाची क्षमता बांधणी पूर्ण होणार नाही असे सरांनी मार्गदर्शन मध्ये सांगितले.
जीवन जगत असताना प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी प्रत्येकामध्ये कपॅसिटी बिल्डिंगचे कलागुण आत्मसात करणे खूप गरजेचे आहे त्यानुसार व्यक्ती ओळखला जातो असे सरांनी संगितले आहे.
यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री सुनिल बल्लाळ सर ,उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे सर, नोडल अधिकारी कविता पाटील व सर्व अधिकारी , सफाई कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर