
शिक्रापूर : कोरेगाव भीमा येथील नरेश्वर वस्ती येथे पत्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहे
कोरेगाव भीमा येथील नरेश्वर वस्ती येथे काही जण जुगार खेळत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, शिपाई जयराज देवकर, किशोर शिवणकर, आदिंनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असताना सहा जण पैसे व पत्याच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे दिसुन आल्यावर पोलिसांनी सर्व जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतलं असुन दहा हजार दोनशे रुपये जप्त केले आहे.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अजित अशोक भंडलकर रा.वढु बु.वय 40, दीपक अशोक गायकवाड वय 38.रा.वाघोली, संजय वाजे वय 49 वाजेवाडी, रतन गावडे वय 48 रा.घाटवस्ती , गणपत मारुती भंडलकर वय 50 रा. पेरणे, संतोष काळुराम ओहोळ वय 38 रा. सणसवाडी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक निरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350559916