स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत चाकण नगर परिषद चाकण यांच्या वतीने सौर ऊर्जा वापराबाबत प्रचार आणि प्रसिद्धी मेळावा

Spread the love
स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत चाकण नगर परिषद चाकण यांच्या वतीने सौर ऊर्जा वापराबाबत प्रचार आणि प्रसिद्धी मेळावा
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये भुमी, जल ,अग्नी , वायू ,आकाश या पंचतत्वाची वृद्धी होण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्याच्याच भाग म्हणून अग्नी या घटकामध्ये ऊर्जा वापर हा महत्वाचा घटक असून सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर होणे व नागरिकानमध्ये जनजागृती होणे यासाठी नगरपरिषदेने शुक्रवार दि. १७.०३.२०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यलयातील शिवछत्रपती सभागृहामध्ये न. प. मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या प्रमुख उपस्थित सौर ऊर्जा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता
यामध्ये मार्गदर्शक म्हणून सल्लागार,पर्यावरण व नैसर्गिक ऊर्जा पुनर्वापर समिती मुकुंद मावळंकर सर यांनी सौर ऊर्जा चे महत्व सांगितले , आजच्या काळात आपल्याला घरगुती वीज वापरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विज बिल येतात जर आपण सौर ऊर्जेचा वापर केला तर आपणाला येणारे बिल हे शून्य किंवा खूप कमी करता येऊ शकतात हे समजावून सांगितले आहे यामध्ये सौर वाटर हीटर, सोलर पॅनल , हिट पंप बसविण्यासाठी सबसिडी लिंकेज उपलब्ध करून देणे , त्यासाठी येणाऱ्या अडचणी कश्या पद्धतीने सोडवाव्या , आपली वीज कशी बचत करावी , महावितरण चे काय नियम असतात , शासनाकडून कशा प्रकारे व किती सबसिडी मिळते, आपण आपल्या खाजगी इमारतीवर 1 किलो वॅट पासून पुढे आपल्या गरजेनुसार प्रकल्प राबवू शकतो त्याची सर्व माहिती दिली आहे. नागरिकांनी , व्यापारी बांधवांनी त्यांना येणाऱ्या अडचणी विषयी अनेक प्रश्न विचारून माहिती घेतली आहे यामध्ये नाशिक मर्चंट को ऑ बँकेचे व्यवस्थापक श्री योगेश राक्षे सर यांनी सुद्धा त्यांच्या बँक तर्फे लोन दिले जातात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. याअनुषंगाने नगर परिषद चाकण ने आपल्या इमारतीवर सुद्धा 20 किलो वॅट चा सोलर पॅनल बसविला आहे त्यामुळे नगर परिषद ला खूप कमी प्रमाणात वीज बिल येत आहे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या प्रकारे आपण पारंपारिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आव्हान मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांनी केले आहे यावेळी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर , उपमुख्याधिकारी श्री राजेंद्र पांढरपट्टे सर, नगरपरिषद विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी, कारपे प्रतिनिधी आणि चाकण शहरातील युवा उद्योजक, बिल्डर ,व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents