कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात शिरूर तालुक्यातील दोघे ठार तर तीन जण जखमी
नगर – पुणे महामर्गावर वाघुंडे शिवारात घटना

Spread the love
कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात शिरूर तालुक्यातील दोघे ठार तर तीन जण जखमी
नगर – पुणे महामर्गावर वाघुंडे शिवारात घटना
शिक्रापूर : अहमदनगर – पुणे महामार्गावर शनिवारी दुपारी कार चालकाचे वहानावरील नियंत्रण सुटून भरधाव कार कंटेनरला बाजूने जाऊन धडकल्याने झालेल्या आपघातात दोघाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत.
ओंकार रविद्र शिंदे व राहुल विलास गुंजाळ (रा. सणसवाडी, ता. शिरूर) अशी या घटनेत मृत्यु झालेल्या युवकांची नावे आहेत. तर प्रमोद रविंद्र धन्वे, अविनाश भागवत वारभुवन व विशाल अशोक कदम अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी सणसवाडी येथील पाच युवक त्यांच्या कार क्रमांक (एमएच 12 युएन 0593) या गाडीने शिर्डी येथे देव दर्शनासाठी जात होते.
सुपा टोल नाक्याच्या पूढे वाघुंडेे बुद्रुक गावच्या हद्दीत कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटुन कार उभ्या आसलेल्या कंन्टेनरला बाजुने जाऊन धडकली. यात जास्त वेगामुळे गाडी कंटेनरच्या खाली घुसली याअपघातात ओंकार रविद्र शिंदे व राहुल विलास गुंजाळ हे दोघे जागीच ठार झाले. तर इतर तिघे जखमी झाले आहे आहेत. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त गाडीतून व्यक्तीना बाहेर काढले व त्यांना सुपा येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents