
अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ४४,४२,०४९/- रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा जप्त केला.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपूनछपून होणारा प्रतिबंधित गुटखा विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री पदमाकर घनवट सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे दि. १९/०३/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि श्री. सतिश पवार, पोउपनि श्री. ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार असे मौजे पुनावळे येथील इला सोसायटीचे समोर आलो असता पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व मितेश यादव यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे पुनावळेमधील गायकवाडवस्तीतील स्मार्ट बाजार नावाचे दुकानाचे मागे असलेल्या पत्राचे शेड मध्ये एका इसमाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करीता साठवणुक करुन ठेवला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी इसम नामे महेंद्रकुमार कान्हाराम परमार, वय २५ वर्षे रा किर्ती क्लासिक गेट, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे येथे भाडयाने मुळ रा गावाचे नाव पाचेटिया, तहसिल मारवा जन्शन, जिल्हा पाली राज्य राजथस्थान याचे ताब्यातुन एकुण ४४,४२,०४९/- रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला व मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे. सदरचा जप्त माल कैलास राठोड व महेंद्र राठोड, रा लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे मुळगाव राजस्थान यांचा असल्याचे सांगितल्याने सदर तीन इसमाविरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो मा. सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे सो मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, श्री पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश पवार, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार सपोफी बाळासाहेब सूर्यवंशी, पोहवा प्रदिप शेलार, पो.हवा. संतोष दिघे, पो. हवा.संदीप पाटील, पोहवा आनंद बनसोडे, पोना मनोज राठोड, पोना मयुर वाडकर, पोना विजय दौंडकर, पोशि रणधीर माने, पोशि मितेश यादव पोशि सदानंद रुद्राक्षे, पोशि अशोक गारगोटे यांनी केली आहे.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर