
गुन्हा उघड एकूण ७,००,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत
दिनांक २२/०३/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संतोष सिंग रा मोशी पुणे यांनी फिर्याद दिली की, त्यांचेकडील सकूल ऑटो प्रा. लि. या कंपनीचे मालकीचा टेम्पो नं. एमएच १४ केए २६७२ हा दि. २१/०३/२०२३ रोजी कंपनीतील कामगार नामे अनिल यादव याने लबाडीच्या इरादयाने चोरी करून गेला वगैरे मजकुराची तकार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं ३१४ / २०२३ भादवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, व चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सपोनि श्री विक्रम गायकवाड यांना व तपास पथकास सदर चोरीस गेलेला टेम्पोचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सपोफी सुरेश हिंगे व पोना भैरोबा यादव यांनी तांत्रीक तपासाव्दारे व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती घेवून टेम्पो व आरोपीचा भाग काढत टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून टेम्पो व आरोपी है। नाशिक येथे गेल्याचे समजल्याने त्याबाबत वरीष्ठांना त्याबाबतची माहीती देवून वरीष्ठांचे आदेशाने तात्काळ तपास पथक नाशिक येथे रवाना झाले व नाशिक येथील सातपूर पोलीस ठाणेच्या हददीत चोरीस गेलेल्या टेम्पोसह आरोपीला पाठलाग करून पकडले. व सदर गुन्हयात आरोपी नामे अनिल उर्फ कुरकुर श्रीनिवास यादव वय ३५ वर्षे रा पिंपरी पो रामनगर ता भनपुर जि बस्ती राज्य उत्तरप्रदेश सध्या राहणार चिनपाडा धनसोली यादवनगर झोपडपटटी जि ठाणे यास अटक करण्यात आलेली आहे. त्याचेकडून चोरीस गेलेला टेम्पो में एमएच १४ केए २६७९ एकूण ७,००,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफौ सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोकों / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.
(विवेक पाटील )
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१,
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर