चाकण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून चाकण एमआयडीसी परीसरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड एकूण ४,२१,०००/- मुददेमाल जप्त

Spread the love
चाकण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून चाकण एमआयडीसी परीसरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड एकूण ४,२१,०००/- मुददेमाल जप्त
दिनांक १०/०३/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पवनकुमारसिंह मॅनेजर सासवड हिट ट्रन्सफर कंपनी चे मागील खिडकीचे गज कापून कंपनीमधील ३५० किलो वजनाचे तांब्याचे धातूचे रोल अज्ञात चोरटयांनी दि. १० / ०३ / २०२३ रोजी चोरी करून नेले वगैरे मजकुराची तकार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिरटी नं २९२ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे तसेच चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री, वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकास सदर अज्ञात चोरट्यांचा व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच घटस्थळावर येणारे जाणा-या रस्त्यावरील त्याच प्रमाणे चाकण परीसरातील सुमारे ५० पेक्षा जास्त ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी लक्षात आले की, सदर गुन्हयातील चोरटे हे रिक्षाने येवून कंपनीमध्ये घरफोडी केलेली असल्याचे तपास पथकास निदर्शनास आले.
तपास पथकातील अधिकारी प्रसंन्न जराड व पोलीस अंमलदार सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पो. हवा. संदीप सोनवणे यांना गोपनिय बातमीदारांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील संशईत दोन आरोपी, रिक्षासह गुन्हयातील माल घेवून आळंदी फाटा परीसरामध्ये माल विक्रीकरीता ग्राहक शोधत आहेत. सदरची बातमीनुसार तात्काळ तपास पथकाचे सपोनि श्री प्रसन्न जराड, सपोफी हिंगे, पोहवा संदीप सोनवणे, पोना कांबळे, पोशि भागवत, असे बातमीच्या ठिकाणी जावून संशईत दोन आरोपींना मालासह व रिक्षासह शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करून सदरचा माल हा त्यांनीच चोरल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदरचे दोनही आरोपी हे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील असल्याची खात्री झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याची नावे १) अशोक विलास खिल्लारे वय २७ वर्षे रा. शांतीनगर भोसरी पुणे मुळ रा. लिंबागणेश पोखरी, ता जि बीड २) कबीर लालसींग गौर उर्फ राहूल वय २६ वर्षे रा. आळंदी फाटा गवते वस्ती चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. आईनाचौडा, कासार, थाना उधारबंद, जि. सिलचर राज्य आसाम यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला संपर्ण माल जसाच्या तसा हस्तगत करण्यात आलेला असून गुन्हयातील वाहन रिक्षा नं. एम एव १४ एच एम ३४९१ ही जप्त करण्यात आलेली असून एकूण ४,२१,८४०/- रू किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफी सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसन्न ज-हाड हे करीत आहेत.
(विवेक पाटील ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १, पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents