

पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे माननीय श्री विजयकुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते महिला कक्ष व मुद्देमाल कक्ष या नवीन वस्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या नवीन इमारतीसाठी रोटरी क्लब पुणे रोटरी डिस्ट्रिक्ट एन आय बि एम 31 31 यांच्या सोहळ्याने व नेक्सटियर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्याने उभारण्यात आली. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माने श्री विनय कुमार चौबे यांनी सांगितले की नवीन महिला पक्ष हा महिलांसाठी वापरण्यात येणारे आहे.या कक्षामुळे महिला अमलदार यांचे कर्तव्याचे कालावधीची अनिश्चितता मुळे महिला अंमलदार यांना पोलीस ठाण्यातच विश्रांती घेण्यासाठी गणवेश बदली करणे याकरता स्वतंत्र महिला पक्षाची आवश्यकता नेक्स्टीयर ऑटोमोटिव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाळुंगे यांचे सहकार्यातुन पूर्ण करण्यात आली तशीच मदत एमआयडीसी मधील इतर मोठ्या कंपन्यांनी केली तर नक्कीच महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे सुविधांसाठी अग्रभागी गेल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले यांना चांगली सोय झाली आहे.महिलांवर होणारे अन्याय व महिलांच्या अडचणी महिला पोलिस पाटील व कर्मचाऱ्यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा व आपल्या कडून काम न झाल्यास आमच्या कडे देण्यात याव्या त्यांना आम्ही आमच्या प्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच त्यांनी नेक्सटियर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व रोटरी क्लबचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला रोटरीचे अजित वाळिंबे नितीन करंदीकर दीपक आव्हाड नितीन मांजरेकर व नेक्सटियर कंपनीचे मनीष भजनाळे, नागेंद्रजी जनरल मॅनेजर, सोनवणे साहेब, सचिन कटपाळे जनरल मॅनेजर, तसेच पोलीस उपायुक्त श्री विवेक पाटील साहेब, पीआय ज्ञानेश्वर साबळे साहेब, पी आय वैभव शिंनगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, विलास गोसावी, दत्तात्रय जाधव, पीएसआय संगीता भंडरवाड व माळुंगेच्या सरपंच मंगल भोसले, ग्रामपंचायत सदस्या अर्चना महाळुंकर, मंगल देवकर, तृप्तीताई मांडेकर, सचिन भोपे, महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस पाटील तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी
