दिनांक २४/०३/२०२३
अल्पवयीन मुलांकरवी मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन,
०८ मोबाईल फोन हस्तगत

Spread the love
दिनांक २४/०३/२०२३
अल्पवयीन मुलांकरवी मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन,
०८ मोबाईल फोन हस्तगत
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी
मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील आधिकारी व अंमलदार यांना मालमत्ता चोरीचे गुन्हयास प्रतिबंध करुन, गुन्हे उघडकीस आणणे बाबत दिलेल्या आदेशा प्रमाणे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उघडकीस न आलेले मालमत्तेच्या गुन्हयांचा घडलेल्या घटनेचा आढावा घेवुन, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह हिंजवडी व वाकड भागात पेट्रोलिंग करीत असतांना पोहवा १३९२ कानगुडे, पोहवा १११७ नलगे व पोना ११२१ गिरीगोसावी + यांना मिळालेल्या बातमीवरुन इसम नामे सुरेश दगडू जगताप वय ३८ वर्षे, रा. कुसगाव जाधव यांचे फार्म हाऊसमध्ये, ता. मावळ, जि. पुणे यास वाकड स्मशानभुमी येथुन ०८ मोबाईलसह ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात मिळालेल्या मोबाईलबाबत तपास करता, त्याने त्याचा अल्पवयीन मुलगा व भाचा यांचेकरवी हिंजवडी भागातुन चोरी केली असल्याचे सांगितल्याने, हिंजवडी पोलीस ठाणे येथे खात्री करता, त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं २७३ / २०२३ भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीकडुन ६५,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे ०८ मोबाईल फोन जप्त करुन, दाखल गुन्हा उघडकीस आणला असुन, त्यास पुढील कारवाईकामी हिंजवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.
( स्वप्ना गोरे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents