

चाकण नगर परिषद मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गर्शनाखाली आज चाकण नगर परिषद चाकण , टेनेको ऑटोमोटिव्ह प्रा ली आणि कारपे व पोलीस स्टेशन दामिनी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 01, 02 आणि उर्दू शाळा चाकण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डावड मळा येथे स्वच्छउत्सव उपक्रम राबविला आहे.
यामध्ये पोलीस स्टेशन च्या दामिनी पथक प्रमुख अर्चना हाडवळे मॅडम यांनी मुलींना येणाऱ्या अडचणी, यामधे आपण बाहेर जात असताना आपण आपल्या कुटुंबासोबत बाहेर जावे , अनोळखी व्यक्ती शी संपर्क साधू नये , शाळेत ये जा करत असताना काळजी घ्यावी , कोणी अनोळखी व्यक्तीने काही खाण्याचे पदार्थ दिले तर आपण सेवन करू नये , घरात आपल्या वरिष्ठ यांचा मोबाईल जास्त प्रमाणात वापरू नये , सोशल मीडिया चा आपण वापर टाळावा, आपल्याला कोणतीही अडचण असेल तेव्हा आपण पालकांना किंव्हा पोलीस स्टेशन दामिनी पथक यांना कळवावे ,जेणे करून मुलींना येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही इत्यादी बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे
तसेच कारपे संस्था यांच्या वतीने शाळेतील मुलांना स्वच्छ सर्वेक्षण अणि माझी वसुंधरा अभियान ची माहिती दिली, आणि आपल्या घरातील कचरा हा आपण वर्गीकृत द्यावा, उघड्यावर कचरा टाकू नये आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तेव्हा शाळेतील मुख्याध्यापिका आणि संपूर्ण कर्मचारी यांनी संपूर्ण मार्गदर्शन चे पुरेपूर पालन केले जाईल अशी ग्वाही दिली आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक , शिक्षिका , शहर समन्वयक कश्मिरा बडगुजर, शहर सल्लागार अभय मेंढे, कारपे प्रतिनिधि महादेव चांदगुडे, रेश्मा ढावरे , विद्या आचारी सुपरवायझर नरेंद्र भोसले उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656