

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गावांना मिळणार पाणी!
आमदार महेश लांडगे यांची विधानसभा सभागृहात मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन
जलसिंचन योजनेला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात १२ गावांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पुढाकार घेतला आहे. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा सभागृहात मागणी केली.
‘‘कळमजाई शेती जलउपसा सिंचन परियोजना, भीमाशंकर’’ योजनेचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या ८ महिन्यांपासून योजनेचे काम सुरू झालेले नाही. डिंभे धरणातील पाणी ६ टक्के प्रवाही उपसा सिंचनासाठी व १४ टक्के ठिबक व तुषार उपसा सिंचनासाठी एकूण २० टक्के प्रकल्पीय पिक रचनेच्या क्षेत्रानुसार १००२ हेक्टर प्रवाही आणि ६९४ हेक्टर ठिबकद्वारे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
या योजनेचा गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी आणि नंदूरकीची वाडी, फळोदे, तळेघर, राजपूर आणि गाडेवाडी, तेरुगन, निगडाळे या गावातील सिंचनलाना फायदा होणार आहे. ही सर्व गावे आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या भागातील सर्व गावे ही शंभर टक्के आदिवासी भागातील असून पेसा क्षेत्रातील (Panchayats Extension to Scheduled Areas Act, 1996 or PESA) आहेत. मात्र, आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे योजना रखडली आहे.
‘‘कळमजाई शेती जलउपसा सिंचन परियोजना, भीमाशंकर’’ या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे का? असेल तर त्याची अंमलबजावणी का झालेली नाही? सर्वेक्षणाचे काम पूर्ण होवून ८ महिने झाले आहेत? पुढील कार्यवाही का रखडली आहे? योजनेचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखला आहे का? असेल तर कधीपर्यंत काम पूर्ण होणार आहे.? आणि संबंधित आदिवासी गावांना पाणी कधी मिळेल?, असे प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केले.
कुकडीच्या पाण्याचे फेरनियोजन करणार…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले की, ही सर्व अदिवासी गावे आहेत. त्यांना पाणी देणं अत्यंत महत्वाचे आहे. आपण जी काय डिंभे धरणातून सिस्टिम उभी केली आहे. ६ टक्के प्रवाही उपसा सिंचनासाठी व १४ टक्के ठिबक व तुषार उपसा सिंचनासाठी नोव्हेबर २००२ च्या जीआर नुसार देतो. आता वाढीव मागणी आलेली ती १२ वेगवेगळ्या घटकांची १० टीएमसीची आहे. कुकडीच्या फेर नियोजनाचा विचार करण्यात येईल आणि जे पाणी उपलब्ध होईल ते पाणी या गावांना उपलब्ध करून दिले जाईल.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656