
श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे उपकार्यकारी अभियंता श्री तळपे साहेब, सहाय्यक अभियंता श्री तांबोळी साहेब, सचिन कळठोणे, अतुल बागडे, निलेश नेबरे, रवींद्र होले, शिवाजी जठर, पुंडलिक दवणे,अक्षय भोंडवे यांनी निमगाव येथील नागरिकांना लाईट बिल भरण्यासाठी जन जागृती केली. ग्राहकांशी संपर्क साधून व हितगुज करून तसेच वेळेवर लाईट बिल भरल्यास आपणास विलंब आकार पडत नाही व लाईट बिलावरील क्युआर कोडने लाईट बिल भरल्यास ग्राहकांना लाईक बिलात दहा रुपये सुठ दिली जाते याची माहिती सर्व ग्राहकांना दिली. यावेळी श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथील नागरिक सोपान शिंदे, दत्तात्रय शिंदे,मधुकर शिंदे ,लक्ष्मण भगत, संजय काळे, शंकर वायकर आप्पा केदारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन काळठोणे यांनी आपल्या सहकार्या समवेत श्री निमगाव येथील घरगुती वीज ग्राहकांना लाईट बिल भरणा करण्यासाठी समक्ष भेटून व लाईट बिल वेळेवर भरल्यास काय फायदे असतात ते सांगुन विज बिल भरणा करण्यासाठी उत्तोजित केले. त्यास निमगाव गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्व विज बिल ग्राहकांचे संबंधित अधिकाऱ्यांनी आभार मानले. तसेच यावेळी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले कि निमगाव पंचक्रोशीतील (डि पी) रोहित्र कायम नादुरुस्त होत असतात तरी आपण(डी पी) रोहित्र दुरुस्त करुन द्यावे अशी मागणी केली. श्री सचिन कळठोणे यांनी सांगितले की संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयी चर्चा करून आपली अडचण लवकरात लवकर दूर करून आपल्याला योग्य न्याय दिला जाईल.
माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी