उन्हाळ्याच्या झळा जंगलातील प्राण्यांना ही जाणवू लागल्या आहेत.चाकण परिसरातील वनपरिक्षेत्रात वनविभागाने जवळ जवळ 40 नवीन पाणवठे तयार केले आहेत.तरी पण काही ठिकाणी जंगलातील चुकारीचे प्राणी वनपरिक्षेत्र सोडून खासगी क्षेत्रात येतात . वनविभाग योग्य ती उपाय योजना करतच आहे .तरी पण भक्ष्याच्या मागे किंवा पाण्याच्या शोधार्थ काही प्राणी भटकत येतात .असाच एक कोल्हा भटकत भटकत चाकण जवळील भोसे गावातील विहिरीजवळ आला.आणि जवळजवळ 70 फूट खोल विहिरीत पडला.ही बातमी चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमचे सदस्य विक्रांत चौधरी यांना समजली त्यांनी त्वरित अन्य आपदा मित्र सदस्यांना अवगत केले. बातमी कळताच चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य बापूसाहेब सोनवणे,रत्नेश शेवकरी, हितेश घुगरे,शांताराम गाडे,श्रीकांत साळुंके,रामचंद्र पाटील,प्रशांत अष्टेकर, वनविभागाचे वनपाल आरुडे ,वनरक्षक किशोर लोखंडे,वनमजुर राघू पारधी,अनिल गांडेकर, खांडेभराड आदी रवाना झाले.रात्री अंधार झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबले.दुसऱ्या दिवशी कोल्ह्याला सकाळी 10 वाजता सुखरूप वर काढण्यात आले व जंगलात मुक्त करण्यात आले.हे रेस्क्यू ऑपरेशन चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम आणि खेड तालुका आपदा मित्र टीम यांनी यशस्वी केले