

बक्षीस वितरण आणि पर्यावरण दूत प्रमाणपत्र वितरण सोहळा
🎖️🏆🎖️🏆🎖️
नगर परिषद चाकण मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविला जात आहे त्याअनुषंगाने आज चाकण नगर परिषद चाकण टेनेको इंडिया प्रा ली आणि कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व नगर परिषद चाकण मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर , नोडल अधिकारी कविता पाटील मॅडम आणि स्वच्छता दूत ह भ प ज्योती ताई गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बक्षीस वितरण आणि पर्यावरण दूत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
शहरातील विविध शाळेतील घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सदरीकरण ,झिंगल इत्यादि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या , त्यानुसार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढून प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विविध शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका , यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यामध्ये खूप मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षक म्हणून त्यांना सुद्धा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी ज्यांनी मोलाचे मार्ग सहकार्य केले असे विविध क्षेत्रातील कर्मचारी, नागरिक यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली अशा नागरिकांना सुद्धा पर्यावरण दूत म्हणून घोषित केले आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे
यावेळी बोलत असताना मुख्याधिकारी बल्लाळ सर यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनात आवाहन केले की स्वच्छतेच्या कार्यामध्ये शहरातील नागरिकांचा शाळेतील विद्यार्थी यांचा खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे असेच सर्वांनी सहकार्य केले तर आपलं चाकण शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास खूप मदत होईल असे सरांनी संगितले आहे.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,शिक्षक शिक्षिका ,मुख्याध्यापक, प्राचार्य शहरातील नागरिक, नगरपरिषद अधिकारी ,कर्मचारी आणि कारपे प्रतिनिधी उपस्थित होते
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970./9370612656