ता. २७/०३/२०२३
दुचाकी चोरटयांना अटक – वाहनचोरीचे २१ गुन्हे उघड सहा लाख रुपये किंमतीच्या २५ मोटर सायकली जप्त
गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

Spread the love
ता. २७/०३/२०२३
दुचाकी चोरटयांना अटक – वाहनचोरीचे २१ गुन्हे उघड सहा लाख रुपये किंमतीच्या २५ मोटर सायकली जप्त
गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनचोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री
विनयकुमार चौबे साहेब यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.. गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी वाहचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी वाहनचोरीचे वाहनचोरीचे गुन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन विशेष योजना तयार केली. युनिट २ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून वाहनचोरी गुन्हयाचा समांतर तप्तस करीत असतांना पोलीस नाईक १९२३ आतिष कुडके व पोलीस कॉस्टेबल १९३१ शिवाजी मुंढे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, टाटा मोटर्स या ठिकाणी काही दिवसापुर्वी हेल्पर म्हणुन कामाला असलेल्या एका कामगाराच्या हालचाली संशयास्पद असुन त्याचेकडे असलेली मोटर सायकल चोरीची असण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदर संशयिताची टाटा मोटर्स मधुन माहीती घेतली असता तो कामावर येत नसल्याचे दिसुन आले त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करुन घेवून तांत्रीक तपास केला. टाटा मोटर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. काही वाहनांना जीसीएस सिस्टीम बसवुन सापळ लावुन निगराणी ठेवली. तांत्रीक तपासामध्ये संशयित इसम हा साधरण प्रत्येक चार दिवसांनी परळी जिल्हा बिड येथे येत-जात असल्याचे दिसुन आले. त्याचेवरील संशय वाढल्याने वरीष्ठांचे परवानगीने गुन्हे शाखा युस्टि २ चे पथक लागलीच परळी जिल्हा बिड येथे पाठवुन शोध घेवून इसम नामे प्रदीप आश्रुबा गायकवाड वय २५ रा. मोहा ता. परळी (बैजनाथ) जिल्हा बिड याला सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे कब्जात चोरीची मोटर सायकल मिळुन आली म्हणुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने टाटा मोटर्स येथुन सुरवातीला एक मोटर सायकल चोरुन परळी येथील त्याचा साथीदार इरफान शेख याला विक्री केली त्यातुन चांगले पैसे मिळालेने व त्याला दारुचे व्यसन असल्याने टाटा मोटर्स येथून वाखार वाहनचोरीचे गुन्हे करु लागला. दहा ते बारा मोटर सायकल चोरीला गेल्याने टाटा मोटर्स येथील सिक्युरिटी वाढविल्यामुळे तो पिंपरी चिंचवड शहरात इतर ठिकाणी मोटर सायकलची चोरी करु लागला. चोरीची वाहने घेणारा त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख वय १९ रा. उड्डानपुलाखाली गौमतनगर परळी जि. बिड याला मोटर सायकली विकल्याची माहीती दिल्याने इरफान शेख याला अटक करुन नमुद दोन्ही आरोपींचेकडे केलेल्या तपासामध्ये एकूण २१ मोटर सायकल वाहने जप्त करण्यात आली.
वाहनचोरीचे तपासामध्ये पोलीस झालदार १०२३ जमीर तांबोळी, पोलीस नाईक १९२४ नामदेव कापसे यांना मिळाले गोपनिय माहीतीवरुन इसम नामे आकाश अनिल घोडके वय २१ वर्षे धंदा- मजुरी रा. भिमक्रांतीनगर पत्राशेड आझाद चौक निगडे यास पेट्रोलिंग मुदतीत ताब्यात घेवून ४ मोटर सायकल वाहने व एक महागडी सायकल जप्त करण्यात आली. तपासामध्ये एक मोटर सायकल स्क्रॅप केल्याचे निष्पन्न झाल्याने भंगार दुकानाचा मालक अमजद जाफर खान रा. हर्षदा हौसिंग सोसायटी लिंकरोड, चिंचवड पुणे यास अटक करण्यात आली.
वाहनचोरीचे तपासामध्ये सुमारे ६ लाख किंमतीच्या एकूण २५ मोटर सायकली जप्त करुन खालील
गुन्हे उघडकीस आणले आहेत-
१) चिखली ८४/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ डीइ ०८६१ २) पिंपरी २८३/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ एफई १४११
३) चिखली ६३५/२२ भादवि कलम ३७९ मधील एम एच १९ बी आर १६४५
४) पिंपरी २४५ / २३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ जीई ८७८०
५) निगडी १३१ / २३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४-जीके ३३५०
६) चिखली ६४९/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच ०९ ईसी ८१२६
७) पिंपरी २९० / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १० सीसी ९३०७
८) चिखली ३४ / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ ईए ६८८७
९) चिखली १११/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ डीवाय ८२१८
१०) चिखली ६१५/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ एफएन ०१०३
(११) चिखली ९२/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच २५ वाय ०८३७
१२) निगडी ४६४ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ डीडब्लु १६०३ (१३) चिखली ६६६ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच ११ बीयम १६१५ (१४) पिंपरी २८९ / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ जीई १०१२
१५) चिखली ३४५ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ बीएस ३२५०
१६) वाकड ४९/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच ४ईएन ७४९३
(१७) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२३ भादवि कलम ३७९ MH 945
(१८) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८६०/ २०२२ भादवि कलम ३७९ सायकल १९) पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर न बर १६ / २०२२ भादवि कलम ३७९ एम एच १४ क्यू ८१७२ (२०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गुन्हा र जिस्टर नंबर ११४ / २०२३ भादवि कलम ३७९ एम एच १४ ईडी ०२०८ २१) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५०/२०२३ भादवि कलम ३७९ एम एच १४ बीजी ८२२२
वरील प्रमाणे वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असुन वाहनचोरी गुन्हयांचे तपासामध्ये असे निदर्शनास आले आहे कि, आरोपी प्रदीप आश्रुबा गायकवाड वय २५ रा. मोहा ता. परळी ( बैजनाथ) जिल्हा बिड हा हॅन्डल लॉक नसलेल्या सहजासहजी ड्युप्लीकेट किल्ली लागेल अशा मोटर सायकली टार्गेट करुन चोरी करायचा व त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख वय १९ रा. उड्डानपुलाखाली गौमतनगर परळी जि. बिड याला विक्री करणेसाठी देत होता. इरफान शेख हा फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरलेल्या जप्त करण्यात आलेल्या गाड्या असल्याचे सांगुन परळी जिल्हा बिड परिसरातील मजुरीची कामे करणा-या गरीब गरजु लोकांना खोटे सांगुन विक्री करायचा असे निदर्शनास आले आहे. तरी नागरिकांना पोलीसांचेवतीने असे आवाहन करण्यात येते कि, बाहनाची कागदपत्रे पहून व कायदेशीर गोष्टीची पुर्तता करुन जुनी वाहने खरेदी करावी तसेच मोटर सायकल मालकांनी मोटर सायकलचे हॅन्डल लॉक करुन वाहन पार्कीगचे ठिकाणी पार्कींग करावे व शक्य झाल्यास जीपीएस सिस्टीम सारखी सिक्युरीट सिस्टीम बसवावी.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुहे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशां अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार केराप्पा माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, प्रमोद चेताळ, उषा दळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत आतिष कुडके, सागर अवसरे, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, संदेश देशमख, उध्दव खेडकर यांनी केली आहे. “
(स्वप्ना गोरे)
पोलीस उप आयुक्त गुन्हे
पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents