दिनांक २८/०३/२०२३
महाव्दार कसबा गेट येथील अंगडीया कुरीअर सव्र्हस सेंटर मधून मारहाण करुन जबदरस्तीने सोन्याची लगड व चांदीचे दागिणे चोरी करणा-या चार चोरटयांना जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करुन ४, २७, ०७०/- रुपयेचा

Spread the love
दिनांक २८/०३/२०२३
महाव्दार कसबा गेट येथील अंगडीया कुरीअर सव्र्हस सेंटर मधून मारहाण करुन जबदरस्तीने सोन्याची लगड व चांदीचे दागिणे चोरी करणा-या चार चोरटयांना जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करुन ४, २७, ०७०/- रुपयेचा
किंमती मुददेमाल हस्तगत करण्यात यश
जुना राजवाडा पोलीस ठाणे हददीतील महाव्दार रोड कसबा गेट येथील अंगडीया कुरीअर सव्हस सेंटर मध्ये दिनांक २४/०३/२०२३ रोजी रात्री ०९.३० वा चे सुमारास चार इसम मोटरसायकल वरुन येवुन त्यापैकी दोन इसम कुरीअर सेंटरच्या बाहेर थांबून रेखी करत होते. व दोन इसम कुरीअर सेंटर मध्ये जावून फिर्यादी व त्यांचा कामगार यांना बोलण्यामध्ये गुंतवून कुरीअर सेंटर मधील सोन्याचे व चांदीचे दागिने असलेली दोन पार्सल जबरदस्तीने उचलुन घेवून जात असताना फिर्यादी व त्यांचा कामगार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतू सदर दोन इसमांनी फिर्यादी व त्यांचा कामगार यांना हाताने मारहाण करुन ढकलून देवून दोन्ही पार्सल जबरदस्तीने चोरुन घेवून पळून गेलेने फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरुन जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २२९/२०२३ भा.द.वि.स.कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव हे करीत आहेत. श्री मंगेश चव्हाण उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर व श्री सतिशकुमार गुरव पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तपासी अधिकारी श्री संदीप जाधव व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य सूचना देवून त्यांची पथके तयार करून आरोपी शोध कामी रवाना केली. चोरी करणारे चारही इसम अनोळखी होते. त्यामध्ये फक्त इसामांचे बोलण्यातून एक इसमांचे नाव निखील सरगर असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले होते. तो धागा पथकाने पकडून निखील सरगर नावाच्या व्यक्तीची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फती खात्रीशीर माहिती काढून निखील सरगर याचा २४ तासाचे आत शोध घेवून त्याचेकडे पथकाने शिताफीने तपास करुन उर्वरीत तीन अनोळखी इसमांचे माहिती घेवून त्यांचा तात्काळ शोध घेवून इसमनामे १] नवनाथ उर्फ निखील किशन सरगर वय २८ रा. साई मंदीर जवळ सुभाषनगर कोल्हापूर, २] सचिन शिवाजी आगलावे वय २१ रा. शाहू कॉलनी गल्ली नं. ३ विक्रमनगर कोल्हापूर, ३] महेश रमेश भोरे वय २२ रा. रेणुका कॉलनी उजळाईवाडी कोल्हापूर, ४] आसफि अकबर मुजावर वय २८ रा. जमादार कॉलनी कदमवाडी कोल्हापूर यांना गुन्हा मध्ये अटक करुन त्यांचेकडे शिताफीने तपास करुन त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला १] ३,०७,७५०/- रुपयेचा ६१.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २] १,१९,३२०/- रुपये किंमतीचे २ किलो ५१२ ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकुण ४,२७,०७० /- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणुन सदर इसमांनी चोरी करताना वापरलेल्या १,६०,०००/- रुपये किंमतीच्या दोन मोपेड गाडया असा एकुण ५,८७,०७० /- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व गाडया हस्तगत केल्या आहेत.
सदरची कारवाई ही श्री शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर, श्रीमती जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर, श्री मंगेश चव्हाण उप विभागीय पोलीस अधिकारी सो, शहर विभाग कोल्हापूर व श्री सतिशकुमार गुरव पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार, परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, प्रितम मिठारी, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, हणमंत कुंभार, गजानन गुरव, अमर पाटील, संदीप माने, गौरव शिंदे, संदीप बेंद्रे, योगेश गोसावी यांनी केली आहे.

प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents