
पुणे जिल्ह्यातील कृषी बाजार समिती खेड संचालक मंडळ सन २०२३ ते २०२८ ची निवडणूक जाहीर झाली असून एकूण १८ जागांसाठी निवडणूक होत आहे.नामनिर्देशनपत्रे विक्री व दाखल करण्याची तारीख २७/ ३/२०२३ ते ३/४/ २०२३ पर्यंत असून नाम निर्देशन पत्र २७/३/ २०२३ ते ३/४/२०२३रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नाम निर्देशन पत्राची छाननी ५/५/२०२३ रोजी सकाळी ११-००ते छाननी पूर्ण होई पर्यंत आहे नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्याची तारीख ६/ ४/२०२३ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख ६/४/२०२३ते २०/४/२०२३ रोजी सकाळी ११ते दुपारी ३ वाजेपर्यंत असून उमेदवारांना निशाणी वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २१/४/२०२३ सकाळी ११.३०वाजता होईल. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २८/४/२०२३ रोजी सकाळी ८ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल.२८/४/२०२३ रोजी मतदान संपल्यानंतर मतमोजणी एक तासात नंतर सुरू करण्यात येणार असून मतदानाचा निकाल त्याच दिवशी मतदान संपल्यानंतर लगेच होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री.सचिन सरसमकर यांनी सांगितले
माननीय मनोहर गोरगल्ले कार्यकारी संपादक