
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुढीपाडवा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येक कार्डधारकांस आनंदाचा शिधा वाटप शंभर रुपयात प्रत्येक रेशनिंग दुकानावरती सुरू करण्यात आला आहे. आज श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे माननीय श्री. भगवान शंकराव शिंदे पाटील चेअरमन विकास कार्यकारी सहकारी सोसायटी निमगाव खंडोबा यांच्या हस्ते आज कार्डधारकांना आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पोपटराव भगवंत तांबे,साहेबराव तांबे, स्वप्निल सोनवणे, गणेश शिंदे, श्री.ज्ञानेश्वर भगवंत घाडगे, सरस्वती काळूराम शिंदे, सखुबाई काशिनाथ गायकवाड, आशा पवार, हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक कार्डधारकाला आनंदाचा शिधा या अंतर्गत रवा एक किलो, चणाडाळ एक किलो, साखर एक किलो, तेल एक किलो, याप्रमाणे शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र