

प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांना सुपर वुमन अवॉर्ड प्राप्त
चाकण वार्ताहर
दि. 27 मार्च
चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांना जागतिक महिला दिनानिमित्त सुपर वुमन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. असमंत व्हाईस अकॅडमी, मुंबई आणि मोरया इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त हा पुरस्कार स्मिता जाधव, स्मिता बारवकर, सचिन दाभाडे यांच्या हस्ते देण्यात आला.
चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी आरोग्य, संस्कार, शिक्षण तसेच ज्ञानम परम ध्येयम, स्पर्धात्मक उपक्रम, कृतीयुक्त शिक्षण, विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सहभाग, पालकांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, चर्चासत्र इत्यादीचे आयोजन केले जाते. सन 2019 पासून विश्वशांतीनिकेतन विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्राचार्या आघाव यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनाने विश्वशांतीनिकेतन विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम साजरे केला जातात. याची दखल घेत अर्चना आघाव यांना सुपर वुमेन अवॉर्ड 2023 आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी, पुणे या ठिकाणी सन्मानपूर्वक देण्यात आला अशी माहिती डायरेक्टर डॉ. डॉक्टर प्रवीण आघाव यांनी दिली.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970