


चिखलगाव येथे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे कौस्तुभ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये साकुर्डी संघ विजेता….
चिखलगाव या ठिकाणी पार पडलेल्या स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित कौस्तुभ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये साकुर्डी चिखलगाव चा संघ विजेता ठरला प्रथम क्रमांक आसाठी एक लाख 55 हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांक साठी मानकर मृत्युंजय इलेव्हन पुणे यांना एक लाख 25 हजार रुपये व चषक तृतीय क्रमांकासाठी चा विजय दत्ताभाऊ आवळे स्पोर्ट्स यांना 75 हजार रुपये मुळशी येथील संघाने विजय प्राप्त केला त्यांना 55 हजार रुपये रोख व चषक देण्यात आला स्पर्धेचे आयोजन दिशा स्पोर्टस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक व युवा नेते बाळासाहेब कडलक यांनी केले होते स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित संघाने भाग घेतला होता पाच दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक प्रकारचे बक्षिसे वितरित करण्यात आले मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल व सायकल अशी अनेक आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली होती स्पर्धेमध्ये शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थिनींना रॉक दहा हजार रुपयाचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेच्या काळामध्ये तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नामांकित व्यक्तींनी भेटी दिल्या पाच दिवस चाललेल्या स्पर्धेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मिळाला गेली सहा वर्षापासून चालू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेला याही वर्षी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला सर्व विजयी संघांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार स्पर्धेचे आयोजक बाळासाहेब कडलक व चिखलगाव चे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी मानलेयाप्रसंगी अरुण शेठ चांभारे बाळासाहेब गोपाळे पप्पूदादा टोपे सरपंच रोहिणी गवारी शोभाताई गोपाळे अजय चौधरी विजय चौधरी गुलाब शेठ कडू तसेच भागातील अनेक सरपंच उपसरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अस्सल न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर ओव्हाळ