
शिक्रापूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर ) येथील सोंडे आळी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंतनु नाना सोंडे ( वय 23. रा सोंडेआळी शिक्रापूर ) असे युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.मात्र आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. मंदार विजय शेंडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कु. सचिन संजय दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350549916