
चाकणच्या डॉ. प्रविण आघाव यांना डॉक्टरेट-डिलीट पदवीवार्ताहर : चाकणदि. 13 मेमॅजिक आर्ट युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, फरिदाबाद, दिल्ली यांच्याकडून श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्था, चाकणचे संस्थापक-सचिव डॉ. प्रा. प्रविण बाबुराव आघाव यांना हॉनरेबल डॉक्टरेट – डिलीट पदवी दि.12 मे 2023 रोजी कॅस्टेल आर्ट थिएटर, दिल्ली येथे सन्मानपूर्वक देण्यात आली.आधुनिक भारताचा इतिहासावर संशोधन, इतिहासाचे गाडे अभ्यासक, योग शिक्षक, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, बौद्धिक क्षमता वाढविणारे कोर्सेसचे अध्यापन व प्रशिक्षण, व्याख्याते, प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्रचार-प्रसार, चाकण येथे सन 2012 सालापासून आरोग्य, संस्कार आणि शिक्षण तसेच ज्ञानम् परम् ध्येयम् या त्री सूत्रीच्या आधारावर ज्ञान दानाच्या कार्य केल्याबद्दल डॉ. प्रविण आघाव यांना डॉक्टरेट डिग्री सन्मान पूर्वक देण्यात आली.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656