
तळेगाव दाभाडे येथील बहुचर्चित किशोर आवारे यांचे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक केलेबाबत.”तळेगाव दाभाडे येथील उदयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर गंगाराम आवारे यांचा दि. १२/०५/२०२३ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद समोर भरदिवसा गोळीबार करत कोयत्याने वार करुन खून करण्यात आलेला होता. सदर प्रकरणी श्रीमती सुलोचना गंगाराम आवारे यांनी दिलेले फिर्यादीवरुन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुरनं. २३३/२०२३ भादवी क. ३०२, १०२ (ब), सह भा. ह. का. क. ३ (२५), ४ (२५) सह महा. पो. का. ३७ (१), १३५, सह क्रि. लॉ. अॅ. क. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी क्र. १) शाम अरुण निगडकर वय ४६ वर्षे, रा. डोळसनाथ आळी, राजवाडयासमोर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे. २) प्रविण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे वय ३२ वर्षे, रा. नाणे, ता. मावळ, जि. पुणे, ३) आदेश विठठल धोत्रे वय २८ वर्षे, रा. नाणे, ता. मावळ, जि. पुणे, ४) संदिप ऊर्फ नान्या विठठल मोरे रा. आकुर्डी, पुणे, ५) श्रीनिवास ऊर्फ शिन्नु व्यंकटस्वामी शिडगल वय ४१ वर्षे, रा. समताकॉलनी वराळे रोड, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे, ६) गौरव चंद्रभान खळदे वय २९. वर्षे, रा. घर नं. १११, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे यांना अटक केलेली असुन त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दि. २०/०५/२०२३ रोजीपावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे.सदर आरोपीनी सदरचा गुन्हा हा यातील मयत किशोर गंगाराम आवारे यांनी आरोपी क्र. ६) गौरव चंद्रभान खळदे याचे वडील चंद्रभान खळदे यांना पाच महिन्यापुर्वी तळेगाव दाभाडे नगरपालिका येथे कानाखाली मारलेचा राग मनात धरुन त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी क्र. १) शाम अरुण निगडकर यास आरोपी क्र. ६ याने सुपारी दिलेली होती. व आरोपी क्र. १ शाम निगडकर याने त्याचे साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केलेचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे.सदर गुन्हयाचा आणखी तपास चालू असुन गुन्हयाचा सखोल तपास होणेकामी सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती केलेली आहे.( काकासाहेब डोळे) पोलीस उपायुक्त, परि. २. पिंपरी चिंचवड आयुक्तालय.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे