


शिरोली येथे जयंती महामानवाची उत्साही वातावरणात साजरी*
खेड तालुक्यातील शिरोली येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात जयंती महामानवांची हा कार्यक्रम मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्रिरत्न कला मंच ने “संस्कार जिजाऊंचे,मी जोतीराव फुले” नाटय प्रयोग करून आणि भीमरायावर पाळणा गायन करून भीम गीतांचा गायनाचा सुमधुर
कार्यक्रम सादर करण्यात आला.
भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयी रिपब्लिकन विचारवंत मा.विनोद निकाळजे, क्रांतीताई खोब्रागडे (IRS), शिवव्याखाते संपत गारगोटे यांनी अगदी तोलामोलाचे मार्गदर्शन केले आहे. सर्व मान्यवरांच्या परिसंवादा नंतर पुरस्कार सोहळा संपन्न झाला.क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार-२०२३
सौ.मोनालीताई निलेश ठाकुर
मा.रंजनाताई भोसले
माता रमाई पुरस्कार -२०२३
अँड.मालिनी प्रितम शिंदे
समाजभुषण पुरस्कार-२०२३
आर्यन आखडे
दत्तात्रय कांबळे
गौतम लाडबा खरत
अल्पेश कांबळे
किसनराव गोपाळे
डाँ.संपत केदारे
संतोष आंबेकर
पत्रकार भुषण
रोहीदास घाडगे
संजय बोथरा
उद्योजक पुरस्कार -२०२३
हंसराज पटेल
काळुराम दजगुडे
जगननाथ दाजी सावंत
सय्यद इनामदार
सुरेखा नाईकनवरे
समीर गोर्हे
अर्जुन विधाते
मनोज सावंत
ललिता कांबळे
सोनराज सावंत
असे विविध क्षेत्रातील तब्बल ५० पुरस्कार निर्मिका फांऊडेशन च्या वतिने देण्यात आले. सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रातील ५० दिग्गज मान्यवरांना यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच ईशान्य भारतातील नागालैंड सारख्या ठीकाणी रिपाई (आठवले )पक्षाचे २ आमदार निवडुन आणुन रिपब्लिकन चळवळीचा निळा झेंडा रोवणारे मा.विनोद निकाळजे साहेब यांचा जाहिर सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी समाजकल्याण विभागाचे माजी आयुक्त मा.ई.झेड.खोब्रागडे,मा.क्रांतीताईखोब्रागडे (सहाय्यक आयुक्त पुणे),रिपाई ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे,मा.रंजनाताई भोसले (मा.नगराध्यक्षा,तळेगांव) मा.दिपक कारंडे(API),अनिलभाऊ मोरे,सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधाकर म्हंकाळे,मा.रज्जाकभाई शेख,मा सरपंच संजय पवळे,कामगार नेते मा.अनिलभाऊ मोरे,बिजेपी चाकण शहर अध्यक्ष मा.प्रितम शिंदे,पी डी सी सी बँक खेड चे सिनिअर अधिकारी दत्ता सावंत,मा चैरमन ज्ञानेश्वरमाऊली खरपासे,ग्रामपंचायत सदस्य,संजय एकनाथ सावंत, मा.संतोष खरपासे,रेटवडी गावचे पोलीस पाटील उत्तम खंडागळे,उदयोजक जगननाना सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय राक्षे , दिपकराव बच्चे,पुणे जिल्हा एक्स्प्रेस प्रोटीन शहनिज कुरणे ,सामाजिक कार्यकर्ते राहुल सावंत, विशाखा लोखंडे,कल्पेश देखणे ,शिरोली शालेय समितीच्या सदस्या निकीताताई देखणे,पत्रकार कुमार नवरे,साहेबराव लोखंडे,विजय सावंत,रुपाली देखणे,मिनल देखणे,शशिकला उमाप आणि शैक्षणिक, सामाजिक राजकीय, पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुभाष कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन निर्मिका फाऊंडेशन, रिपब्लिकन कष्टकरी संघटना, अरगी फाऊंडेशन, मैत्रीसंघ विहार चाकण यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्तावना रिपब्लिकन नेते हरेशभाई देखणे यांनी केले. निर्मिका फांऊडेशनच्या सचिव मा. निर्मलाताई देखणे यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष
तुषार गायकवाड,उपाध्यक्ष सत्यवान शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सचिन देखणे निरंजन देखणे अतुल देखणे, तेजस बनसोडे तसेच बारा बलुतेदार संघटना (ठाकुर पिंपरी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा जयंती आणि सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.रिपब्लिकन नेते हरेशभाई देखणे यांनी जयंती समवेत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सन्मान सोहळा आयोजित केल्या बदल त्यांचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970