
प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया 2023 पुरस्कार
वार्ताहर : चाकण
दि. 13 मे
मॅजिक आर्ट युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, फरिदाबाद, दिल्ली यांच्याकडून प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना दि. 12 मे 2023 रोजी दिल्ली येथे आयर्न लेडी ऑफ इंडिया 2023 चा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सन्मानचिन्ह, सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि पुरस्कार रेकॉर्ड पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शिक्षणतज्ञ डॉ. शैलेश सिंग, प्रति म. गांधीजी श्री. हॅपीनेस गुलाटी, सिनेकलाकार श्री. मनोज भाटिया, आतंरराष्ट्रीय जादूगार डॉ. सी पी यादव यांच्या हस्ते प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना पुरस्कार देण्यात आला.
प्राचार्या अर्चना प्रविण आघाव या योगा शिक्षक, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, बौद्धिक क्षमता वाढविणारे कोर्सेसचे अध्यापन – प्रशिक्षण, राष्ट्रीय स्पर्धेच्या चेअरमन, आंतरराष्ट्रीय परीक्षेच्या परीक्षक, आरोग्य, शिक्षण आणि संस्कार तसेच ज्ञानम् परम् ध्येयम् या त्री-सूत्रीच्या आधारावर सन 2012 सालापासून संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आजपर्यंत प्राचार्या अर्चना यांना आदर्श प्राचार्या पुरस्कार, सुपर वुमन अवॉर्ड या सारखे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
अस्सल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक लहू लांडे