गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त

दि. १६/०५/२०२३
गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त.
गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडिल अधिकारी व अंमलदार हे मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील आरोपी नामे राहुल दगडु शिंदे वय २० वर्ष रा. बि. न १०, रुम नं १०३, श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे याचे मागे सुमारे ६ महिण्या पासुन होते त्यास मोठ्या शिताफिने पकडुन सांगवी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १६३ / २०२३ भा. दं. वि. कलम ३७९ या गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडे अटक मुदतीत कसून तपास करुन त्याने पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागातुन सुमारे १ वर्षापासुन चोरुन आणलेल्या एकुण किं रुपये ५,१०,०००/- च्या ११ मोटार सायकली हस्तगत करुन एकुण ०७ गुन्हे उघडसकिस आणले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-४ कडिल वाहनचोरी करणारे अभिलेखारील गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना खात्रीशिर बातमी मिळाली कि रेकॉर्डवरील वाहन चोरीचे गुन्हे करणारा इसम नामे राहुल दगडु शिंदे रा. बि. न १०, रुम नं १०३, श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे हा बऱ्याच दिवसांपासुन त्याचे मुळ पत्त्यावर राहणेस नसुन त्याने पिंपरी चिंचवड हद्दितील व पुणे जिल्ह्यातील इतर भागांतील मोटार सायकली चोरुन त्याचे ओळखीचे लोकांना विकल्या आहेत, वगैरे बातमी मिळाल्यावरुन त्याचेबाबत इतर गोपनिय बातमिदारांना कळवुन त्याचा शोध घेत होतो, दिनांक ११/०५/२०२३ रोजी सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उप निरीक्षक गणेश रायकर, सपोफी जाधव, पो.हवा. तुषार शेटे, मोहम्मदगौस रफिक नदाफ पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो गुन्हे शाखा युनिट ४ पिपरी चिंचवड यांच्या आदेशान्वये राहुल दगडु शिंदे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दितुन तसेच पुणे जिल्ह्याचे इतर भागातुन चोरलेल्या वेगवेगळ्या मोटारसायकल / मोपेड दुचाकी ह्या वेगवेगळ्या इसमांना विकल्याचे केले तपासामध्ये निष्पन्न करुन आरोपी नामे राहुल दगडु शिंदे वय २० वर्ष रा. बि. न १०, रुम नं १०३ श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे याने विकलेल्या ०७, लपवुन ठेवलेल्या ०३ अशा मोटारसायकल / मोपेड जप्त करण्यात आल्या व रांजणगाव पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३९५ या गुन्ह्यात जप्त असलेली मोटारसायकल बाबतचा गुन्हा उघडकिस आणण्यात आला.
सदर गुन्हयातील आरोपी याचेकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल / मोपेड पैकी ०४ मोटारसायकल / मोपेड मालकांबाबत माहिती मिळुन येत नाही, सुमारे ०१ वर्षाच्या कालावधीमध्ये वाहनचोरी झालेल्या नागरीकांनी गुन्हे शाखा युनिट-४ येथे जप्त ०४ वाहने आपली आहेत अगर कसे याबाबत संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय / गुन्हे स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, पो.हवा. रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मदगौस रफिक नदाफ पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.
(स्वप्ना गोरे) पोलीस उप-आयुक्त मुख्यालय / गुन्हे पिंपरी चिंचवड
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656