दिनांक १८/०५/२०२३

Spread the love

गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी.

गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी.

मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ, गुटखा याबाबत विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने दिनांक १७/०५/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह वाकड, सांगवी भागात पेट्रोलिंग करुन, पिंपरी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये वायसीएम हॉस्पीटल समोर, फाऊंटन चायनिज जवळ आले असता, फाऊंटन चायनिज समोर एक इसम त्याचे हातामध्ये एक सफेद रंगाची पिशवी घेवुन काव-या बाव-या नजरेने इकडे तिकडे पहात संशयीतरीत्या थांबलेला दिसला. त्यावेळी सदर इसमाने सरकारी वाहन पाहुन तो घाबरुन गडबडीत त्याचे ताब्यातील पिशवीसह पळुन जावु लागल्याने, त्याचा संशय आल्याने, सपोनि खाडे यांनी स्टाफसह त्याचा पाठलाग करून, थोडयाच अंतरावर इसम नामे रवि चंद्रकांत थापा, वय ३२ वर्षे, रा. सर्व्हे नं. १०३, नेहरुनगर, अॅटलॉस कॉलनी जवळ, पिंपरी, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात असलेल्या सफेद रंगाचे पिशवीमध्ये काय आहे ? तसेच सरकारी गाड़ी पाहुन गडबडीत का पळुन जात होता? असे विचारले असता, त्याने त्याचे ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ व मेफेनटरमाईन इंजेक्शन असल्याचे सांगीतले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधुन औषध निरीक्षक यांना बोलावुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये १६,०५०/- रुपये किंमतीचा ६४२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, २५.४६०/-रु किंमतीच्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या ९५ पॅकबंद बाटल्या व रोख २,०००/- रुपये असा एकुण ४३,५१०/- रु किं चा माल मिळुन आल्याने, तो जप्त करुन, त्याचे विरुध्द पिंपरी पोलीस ठाणे गुरनं. ५४१ / २०२३ भादवि कलम २७६,३३६,३२८ व एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशन हे करत आहे.

सावधानतेचा इशारा : MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP हे औषध जास्त करून कॉलेजची मुले जिम मध्ये जास्त वेळ व्यायाम व्हावा व शरीर चांगले दिसावे तसेच सेक्स पावर वाढावी यासाठी करतात अशी माहिती मिळाली आहे. परंतु सदरचे औषध घेण्याचे दुरगामी परिनाम होतात असे औषध निरीक्षक यांचे मत आहे. त्यामुळे असे औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन शिवाय घेवू नये असे अहवान पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनिल कानगुडे व प्रदीप गुट्टे यांनी केली आहे.

( स्वप्ना गोरे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents