
पुणे. आळेफाटा
रिझर्व बॅंकेच्या धोरणे नुसार बँकेच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी बँक आता पतसंस्था व्यवस्थापक म्हणून आपली राहील .
➡️बँकेत पतसंस्थेत ग्राहकांची रोख रक्कम दागिने व लोकर मधील मौल्यवान वस्तू बँकेत आलेल्या ग्राहकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आपली राहील .
➡️चोरी दरोड्या सारखा प्रकार होऊ नये म्हणून 24 तास बँक व एटीएम च्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड नेमावे .
➡️बँक पतसंस्थेच्या आतील व बाहेरील चारही बाजूस परिसर कव्हर करणारे नाईट विजन चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत .
➡️बँकेच्या एटीएम च्या प्रत्येक दरवाजा सिक्युरिटी सिस्टीम आलाराम सिस्टीम बसवावी .
➡️बँकेतील तिजोरी व दरवाजाचे कुलपे भक्कम असावी .
➡️बँकेचा संस्थेचा दरवाजा खिडक्या यांना आतून व बाहेरून लोखंडी ग्रील मजबूत अशा पद्धतीने बसवून लावून घ्यावीत .
➡️बँकेच्या एटीएम च्या आतील बाजूस व बाहेरील बाजूस रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट व्यवस्था असावी .
➡️रुक रक्कम नियान करण्यासाठी सुरक्षित वाहन व सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमावेत .
➡️बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांना दिसतील अशा ठळक अक्षरात सूचना तसेच दोन्ही पित लावून ठेवावे जेणेकरून ग्राहकाची किंवा वयस्कर जेष्ठ नागरिकांची फसवणूक होणार नाही यासाठी ते दक्ष राहतील .
➡️ऑनलाइन फसवणूक किंवा ओटीपी देऊन फसवणूक होणार नाही यासाठी बँकेतर्फे ग्राहकांसाठी सूचना कराव्यात .
➡️ चोरी दरोडे होऊ नये यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना आपण करून घ्याव्यात .
➡️ बँकेतून कॅश मुख्यालयात नेताना किंवा आणताना चोरी किंवा दरोडा होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी
➡️ आपली सुरक्षा यंत्रणा रोजचे रोज सुरू आहे का याबाबत खात्री करावी
➡️ आपले आस्थापनेच्या आजूबाजूस फसवणूक करणाऱ्या योजना कोणी सुरू केल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.
➡️ बँकेमध्ये येणारे ग्राहकांनी मास्क किंवा टोपी घालून येण्यास मनाई करावी.
वरील प्रमाणे सूचना करण्यात आले असून त्यांचे अंमलबजावणी करून घेत आहोत .