
शिक्रापूर,दि. 27 (वार्ताहर)* – कोंढापुरी येथील पुणे-नगर महामार्गावर भर धाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेने चिरडून मेहेरबान गायकवाड हा व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. येथील मेहेरबान गायकवाड शनिवारी सकाळच्या महाराज पुणे-नगर महामार्गावरून इंटिग्रेटेड कंपनीत कामाला जाताना पाठीमागून (एम एच 14 सीपी 4177) आलेल्या कंटेनर ची धडक बसल्याने ते चिरडले गेले. कंटेनर चालक पळून गेला. यावेळी नागरिकांनी गायकवाड यांना ग्रामीणरुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मेहेरबान विठ्ठल गायकवाड (वय 58, रा. गोगावले वस्ती, कोंढापुरी ) यांना मृत घोषित केले. पोलीस हवालदार राजेश माने तपास करत आहेत.
अस्सल न्यूज महाराष्ट्र