शिक्रापूरच्या माजी उपसरपंचचा जामीन फेटाळला

Spread the love

शिक्रापूर वार्ताहर : शिक्रापूर ता. शिरुर येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात यांनी तलाठी कार्यालयात महिला तलाठी यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी उपसरपंच रमेश राघोबा थोरात यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले असताना त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी धाव घेतेली असताना विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी रमेश थोरात यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

                          शिक्रापूर ता. शिरुर येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात यांच्यावर ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर थोरात तातडीने गायब होत त्यांनी न्यायालयात धाव घेतली दरम्यान त्यांची बाजू न्यायालयात मांडताना आम्ही लोक प्रतिनिधी असल्याने आम्हाला या प्रकरणात अडकवले असून आम्ही कोणतेही जातीवाचक विधान अथवा शिवीगाळ करत कार्यालयातील कागदपत्रे फेकली नसल्याचे सांगत रमेश थोरात यांच्या वकिलाने बाजू मांडली मात्र तलाठी सुशीला गायकवाड यांची बाजू मांडणाऱ्या ॲड. निलेश वाघमोडे, ॲड. राकेश सोनार, ॲड. महेश देशमुख यांनी आरोपी रमेश थोरात यांना जमीन मंजूर केल्यास त्यांच्या सह त्यांचे साथीदार फिर्यादी तलाठी यांच्यावर दबाव आणतील हे न्यायालयात पटवून दिले असता अखेर न्यायलयाने रमेश थोरात यांचा जामीन फेटाळला आहे. तर यावेळी न्यायालयात बाजू मांडताना फिर्यादी असलेल्या महिला तलाठी यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो असे देखील ॲड. राकेश सोनार यांनी न्यायालयात सांगितले आहे.

कु.सचिन दगडे
शिरुर तालुका प्रतिनिधी
8767358432 / 7350559916

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents