
पुणे खेड.
करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आशाभगिनींना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी मनसे जनसंपर्क कार्यालय व खासदार अमोल कोल्हे यांना पत्राद्वारे तक्रार दिली होती या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून खेड च्या आरोग्य अधिकारी डॉ.इंदिरा पारखी यांना निवेदन दिले व उपोषणाचा इशारा देण्यात आला होता या प्रकाराची सखोल चौकशी करून काल करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली व सर्व आशा भगिनींची बाजू समजून घेऊन या प्रकारातून योग्य मार्ग काढला.
यावेळी खेड तालुका आरोग्य विभाग अधिकारी डॉ इंदिरा पारखी मॅडम,आशा स्वयंसेविका संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन, मनसेचे खेड तालुकाध्यक्ष संदीप पवार, मनसे जनहित कक्ष चे खेड तालुकाध्यक्ष विवेक येवले पाटील आशा गट प्रवर्तक व तक्रारदार महिला आशा भगिनी उपस्थित होत्या
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886