
कै. दत्तात्रय खंडू जाधव. वय ( ४९ ) हे रांजणगाव गणपती येथील रहिवासी असून मुळ गाव दावडी ता.खेड,जि.पुणे. तसेच ( जिल्हाध्यक्ष भा.ज.पा विद्यार्थी आघाडी शिरूर लोकसभा ) मा.पै.श्री हर्षददादा जाधव, मा.पै. निषेद जाधव यांचे ते वडील होत, रांजणगाव गणपती येथील बसस्थानकावरून मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पो ने धडक दिली असता शिरूर याठिकाणी वेदांत हाॅस्पिटल या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा हा परिवार आणि यातील अग्रेसर असणारे गरिब संयमी व्यक्तिमत्त्व गेल्याने खरोखरच रांजणगाव आणि परिसरातील नातेवाईक, ग्रामस्थ सर्वांना मोठ दुःख झाले आहे त्यांच्या पाठिमागे त्यांची पत्नी, २ मुले, आई-वडील, भाऊ, सुन, बहिण आणि इतर सर्व असा खुप मोठा परिवार आहे.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886