रिपब्लिकन शेतकरी कष्टकरी संघटनेचा तहसिल कार्यालय खेड येथे भिमसैनिक अक्षय भालेराव खुन प्रकरणी निषेध मोर्चा*. . .

Spread the love

रिपब्लिकन शेतकरी कष्टकरी संघटनेचा तहसिल कार्यालय खेड येथे भिमसैनिक अक्षय भालेराव खुन प्रकरणी निषेध मोर्चा*. . .

बोंड‍ार हवेली ता.नांदेड येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन भिमसैनिक शहिद अक्षय भालेराव यांचा निघृर्ण खुन करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतिने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.हरेशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ जुन २०२३ रोजी ” निषेध मोर्चा ” चे आयोजन तहसिल कार्यालय खेड येथे करण्यात आले होते
आरोपींन‍ा फाशी झालीच पाहीजे. . .अक्षय भालेराव यांच्या कुटु्ंब‍ाला न्याय मिळालाच पाहोिजे. . .जातीयवादी मानसिकतेच्या लोकांचे करायचे काय?खाली डोके वर पाय. . . अश्या घोषणांनी तहसिल कार्यालय परिसर दणाणुन गेला.
आळंदी यात्रेच्या नियोजनात व्यस्त असल्याने मा.वैशाली वाघमारे या तहसिल कार्यालयात उपलब्ध असु शकल्या नसल्याने नायब तहसिलदार पी.डी.माळी यांनी बाहेर यऊन आंदोलकांना शांत केले.व निवेदन स्विकारले.
*आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहीजे.
*सदर खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवुन अँट्रोसिटी कायद्याच्या नियमानुसार दोन महिन्यात निकाली काढण्यात यावा.
*मयत अक्षय भालेराव यांच्या कुंटुंबाचे जमीन,नोकरी,पेन्शन देऊन पुनर्वसन करण्यात यावे. इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या. सर्व कायदेशीर मुद्दयांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा मंत्रालय मुंबई येथे रिपब्लिकन शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.हरेशभाई देखणे यांनी दिला.
अक्षय भालेराव यांचा खुन करणार्या आरोपींना जामीन न देता फास्ट ट्रँक कोर्टात चालवुन अँट्रोसिटी कायद्याच्या नियमानुसार निकाली काढण्यात यावा.अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी केली.
अक्षय भालेराव यांची हत्या करणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य आहे.तसेच महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे.याकडे राज्यशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे असे मत निर्मला देखणे यांनी व्यक्त केले.तसेच मुख्यमंत्री,गृहमंत्री यांनी अक्षय भालेराव व त्यांच्या कुंटुंबाची लवकरात लवकर भेट न घेतल्यास मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचे दिलीप पालवे यांनी सांगितले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रमोद खोब्रागडे,तुषार जगताप,दत्ता गायकवाड,जिल्हा नेते चेतन सोनवणे,खेड ता.कार्याध्यक्ष सत्यवान शिंदे,खेड ता.उपाध्यक्ष सोनाली गायकवाड,म‍ावळ तालुक्याचे नेते राहुल अलकोंडे, जीवन जेटीथोर,सुशिल दामले,दिपरत्न गजभिये,महेंद्र पेंढारकर,दिपक रणविर,सुनील भालेराव,आकाश खंडागळे,स्वप्नील गायकवाड,सत्यवान शिंदे,प्रथमेश गोसावी,राज कदम,शांताराम गायकवाड,नागेश गुरव,आयुष खंडागळे,निखिल भोंडवे,सार्थक गायकवाड,रोहन भालेराव,रोहित भालेराव,रंजना गायकवाड,मोहिनी डुबे,इंदुबाई गायकवाड,स्वालिका भालेराव इ.उपस्थित होते.‍

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents