

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2023 रोजी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी व शिक्षकांनी चाकण नगरपरिषद कार्यालयास भेट दिली.
माननीय विजय भोंडवे यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी पाणी वितरण अभियंता सौ कविता पाटील यांनी हवामान बदलाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम, जागतिक पर्यावरणावर होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढीचे परिणाम ,पर्यावरण संवर्धनात सामान्यांचे योगदान यावर विशेष मार्गदर्शन केले तसेच प्लास्टिक प्रदूषणावर आधारित एक क्लिप सादर केली.
याप्रसंगी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रणदिवे यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक प्रदूषणावर उपाय हि या दिवसाची थीम होती, त्यामुळे नगर परिषद कचऱ्याचे विलगीकरण कसे करत आहे, प्लास्टिकचा पुनर्वापर कसा केला जातो, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
समन्वयक सौ. वंदना सरनाईक यांनी प्लास्टिक विलगीकरण आणि समाजाची गरज याविषयी सांगितले आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
राजलक्ष्मी कड या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने ई-कचरा व्यवस्थापनाविषयी सांगितले.
मा. देशमुख सरांनी विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले व नगरपरिषदेच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले
यावेळी श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शामराव देशमुख व रोहिणी देशमुख आवर्जून उपस्थित होते. विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. श्री दीपक शिंदे, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या PRO सौ .अंजली विखे
तसेच नगरपरिषद उपायुक्त मा. राजेंद्र पांढरपट्टे, शहर समन्वय अधिकारी श्री अभय मेंढे व पर्यवेक्षिका सौ मंगल गायकवाड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची संकल्पना मोनाली नलावडे यांची तर संस्कृत पथनाट्य हर्षदा जोशी लिखित व दिग्दर्शित होते. शाळेने या प्रसंगी पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालयाला रोपे भेट दिली.
हर्षा वैद्य यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली तर पर्यवेक्षक श्री . विजय भोसले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. अतिशय उत्साही व उत्स्फूर्त वातावरणात आजचा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886

