

पुणे चाकण…
शाळा-राणुबाईमळा नवागतांचे स्वागत 🌻*
👉🏻जि.प.प्रा.शाळा,राणुबाईमळा, चाकण, केंद्र कुरुळी,बीट चाकण तालुका खेड, जिल्हा पुणे,या शाळेतील मुख्याध्यापक प्रकाश लांडे सर, उपमुख्याध्यापक सुवर्णा चव्हाण मॅडम, सुनीता मुंगसे मॅडम, वैशाली रणपिसे मॅडम, युसूफ आतार सर, जयश्री मुकणे मॅडम, गंगा सावंत मॅडम, कीर्ती वराडे मॅडम सर्वच सहकारी शिक्षक यांनी शैक्षणिक वर्ष सन-२०२३-२४ या वर्षातील शालेय नियोजन करून आज दिनांक,15/06/2023,(गुरुवार) रोजी सकाळी,१० या वेळेत नवागतांचे,स्वागत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न केला . सर्व पहिलीच्या मुला मुलींना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन बिस्किट पुडा, हातामध्ये रंगीत फुगा देऊन स्वागत केले. ढोल ताशा झानजाच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढून रानुबाईमळा परिसर शैक्षणिक घोषणा साक्षर जनता भूषण भारता, सारे शिकूया पुढे जाऊ याने गजबजून गेला. प्रत्येक नवागाताच औक्षण करून स्वागत महिला भगिनींनी केलं . त्यानंतर सरस्वती मातेच्या चरणी मस्तक ठेवून शैक्षणिक कार्याचा आशीर्वाद घेतला. धूळपाटीवरती ओम, मुळाक्षरे आदी अक्षरे गिरवून त्यानंतर आपल्या हाताचा ठसा ….शुभ संकेत म्हणून कागदावर उमटल्यानंतर पालकांच्या व नवागातांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. त्यानंतर मुख्याध्यापक प्रकाश लांडे सर , सर्व सहकारी शाळा शिक्षक, व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तके लेखन साहित्य वाटून पहिल्या दिवसाचा शैक्षणिक शुभारंभ झाला.
आपला वर्ग , पाठ्यपुस्तके प्राप्त प्रमाणे वाटप, नियोजन केले. उपस्थित पालक व शाळा समितीच्या सदस्यांनी शालेय नवागत स्वागत, पुस्तक वाटपामध्ये मोलाचे सहकार्य केले .!
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656