
बकरी ईद निमित्त मुस्लीम समाज जामा मशीद या ठिकाणी नमाज पठन झाले. बकरीईद हे त्यागाचे व बलिदानाचे प्रतिक आहे. समता, बंधुता, न्याय / है या माध्यामातून समाजाला संदेश देतो. द्वेष व मत्सर या पासून दूर रहाणे व मानवतेचे तसेच राष्ट्रीय एकात्मिकेचा संदेश देते .योगायोग म्हणजे आषाढी एकादशी व बकरी ईद हे एकाच दिवशी सन साजरी होत आहे. वारकरी संप्रदाय व सुफी संत यामध्ये समानता होती याचेच दर्शन या निमीतत्त होते असे प्रतिप्रादन चाकण शहर राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष मुबीनभाई काझी यांनी केले.
तसेच मा उपसरपंच साजदिभाई सिकलकर यांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले की सर्व मुस्लीम समाजाने दुसऱ्या धर्माचा आदर करावा तसेच आपली कुर्बानी दुसऱ्या दिवशी साजरी करावी. यावेळी दिलावर भाई आतार, आयाज आतार, पप्पुभाई काझी, जावेद काकर समिरभाई सिकिलकर अबिद भाई आत्तार जावेदभाई शेख उपस्थित होते.
अस्सल न्यूज महाराष्ट्र 9766694886