

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्याचे आरोपी तात्काळ अटक करण्यात यावे – आकाशभाऊ शांताराम डोळस पुणे जिल्हाउपाध्यक्ष खेड ता. युवक अध्यक्ष आर.पी.आय (A)
शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुणे येथील दिघी येथे रविवारी दिनांक 25 जून 2023 रोजी व्याख्यान करतेवेळी 15 ऑगस्ट हा काळा दिवस आहे भारतीय राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही तसेच तिरंगा आमचा राष्ट्रध्वज नाही असे म्हणून राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा अपमान आपल्या भाषणातून केला आहे, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही या दिवशी सर्वांनी उपवास करावा व दुखावटा पाळावा असे संभाजी भिडे म्हणाले त्यांच्या या वक्त्यावरून पुन्हा एकदा भारतीय अस्मिता असणाऱ्या राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज तसेच राष्ट्र महापुरुषांचा अपमान झाला असून यावेळी सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे संभाजी भिडे यांनी यापूर्वी अनेक वेळा देश विघातक वक्तव्य केले आहे आत्ताचे वक्तव्य देखील त्यांनी जाणीवपूर्वक देशात व महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे हेतूने विधान केले आहे त्यामुळे देशात व महाराष्ट्रात आराजकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणून वारंवार असं जाहीर वक्तव्य करून देशाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971 कायदा अंतर्गत तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, व आज दि 28/6/2023 रोजी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद जी यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज खेड पोलीस स्टेशन येथे जाहीर निषेध याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ खरात यांच्या मार्गदर्शनात व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणे जिल्हा उपाध्यक्ष खेड ता. युवक अध्यक्ष आकाशभाऊ शांताराम डोळस यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले.त्याचवेळी खेड तालुक युवक उपाध्यक्ष निलेश शेठ भोसले व चेतन शेठ रनविर व ॲड विश्व शेठ धुमाळ हे कार्यकरते उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886