
शिरूर,दि.1 जुलै : (प्रतिनिधी)
ता.15/06/2823 रोजी रात्री 8:00 वाजण्याच्या सुमारास तांदळी ,ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हद्दीत तांदळी ते निर्वी जाणार्या रोडवर बाजीराव भागुजी अडसुळ यांच्या विटभट्टी जवळुन फिर्यादी अजय सुरेश बरडे, वय- 22 वर्षे, धंदा-मासेमारी, रा. गांधलेमळा , इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे याचे चुलते अनिल कचरू बरडे, वय- 35 वर्षे, रा. गांधलेमळा, इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे हे त्यांच्या ताब्यातील सायकलीवरून तांदळी बाजुकडुन इनामगाव बाजुकडे घरी येत असताना त्यांच्या सायकलीला पाठीमागुन येणार्या कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील अज्ञात वाहन हे रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून जाणार्या फिर्यादीच्या चुलत्यांच्या सायकलीला पाठीमागुन धडक देवून अपघातात त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाला आहे व अपघाताची माहिती न देता तसाच पळून गेला आहे.
कु.ईश्वर दरवडे
रांजणगाव प्रतिनिधी
7387870062 बातमी व जाहिराती साठी संपर्क
संपादक लहुजी लांडे
9766694886