


ज्ञान, कर्म आणि भक्ती ही त्रिसूत्री आपल्या आयुष्याला जोडा – प्रा. अजित फापाळे
मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा, स्थानिक केंद्र, चाकण, विश्वशांतीनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त पालक वर्गांसाठी बालकाच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांची भूमिका या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
बालकाच्या विकासामध्ये पालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये, हार्मोन्स बदल, खेळ, व्यायाम, आहार, योगासने, भय, राग, धैर्य, शांती याचा कसा परिणाम होतो. लहान मुलांमध्ये अभ्यासविषय, आरोग्यविषयक, वर्तनविषयक समस्या कशा निर्माण होतात, त्यावर कोणते उपाययोजना करायची. मुलांची शिक्षणाची सुरुवात ही घरामध्ये होते. मुलांची पहिली आई शिक्षिका असते. घर हे मंदिर आहे ते स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे. त्याचबरोबर ते पवित्र असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. अजित फापाळे यांनी केली. लहान मुलांच्या मेंदूचा विकास कसा होतो, कसा बदल होतो. शिक्षणाला संस्काराची तर वैभवला शांतीची जोड असावी, असा बहुमूल्य सल्ला फापाळे यांनी पालक वर्गांना दिला. यावेळी विश्वशांतीनिकेतन विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. आलेल्या पालकांची स्वागत प्रा. प्रवीण आघाव सर यांनी केले. मनीषाताई बनकर यांनी मनशक्तीच्या उपक्रमाचा सविस्तरपणे परिचय दिला. आभार प्रदर्शन प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी केले.