शिक्रापूरात चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून गंभीर जखमी

Spread the love

शिक्रापूर प्रतिनिधी : शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंगवाडी येथील हरमणी सोसायटी मध्ये असलेली लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळून खाली आदळल्याने अशोक रंगराव नरसूगडे हा इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लिफ्ट बसवून देणाऱ्या किरण डोंगरे या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                                शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंगवाडी परिसरातील कृष्णमंदिर लगत नव्याने हरमणी सोसायटी निर्माण झालेली असून सदर सोसायटीसाठी लिफ्ट बसवण्यात आलेली असून सदर लिफ्ट किरण डोंगरे यांनी बसवलेली असून तिची देखभाल व मेंटेनस बिल्डर नंदकुमार लपालीकर हे करत आहेत, सदर सोसायटीमाध्येक चौथ्या मजल्यावर राहणारे अशोक नरसूगडे हे लिफ्ट मधून त्यांच्या सदनिकेमध्ये जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट गेल्यानंतर अचानक लिफ्ट खाली कोसळली आणि खालच्या मजल्यावर येऊन आदळली गेली यामध्ये अशोक रंगराव नरसूगडे वय ४७ वर्षे रा. शिक्रापूर हरमणी सोसायटी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चिकूरळे ता. वाळवा जि. सांगली हे गंभीर जखमी होऊन त्यांचे दोन्ही हात, पाय तसेच पाठीचा मणक्याला गंभीर दुखापत झाली, सध्या त्यांच्या दोन्ही पाय व हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याबाबत अस्मिता अशोक नरसूगडे वय ३५ वर्षे रा. शिक्रापूर हरमणी सोसायटी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चिकूरळे ता. वाळवा जि. सांगली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी बिल्डींग मध्ये लिफ्ट बसवणाऱ्या किरण डोंगरे रा. हडपसर पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.

कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7769871685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents