
रांजणगाव प्रतिनिधी ) : कारेगाव ता. शिरूर येथील बाभूळसर रोड लगत एका जन्मदात्या आईनेच आपल्या अकरा वर्षीय मुलीला काठीने मारहाण करत चमचा गरम करून हातावर पायावर चटके दिल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे कोमल आदित्य उत्तम या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
कारेगाव ता. शिरूर येथील बाभूळसर रोड लगत राहणाऱ्या कोमल उत्तम यांची अकरा वर्षीय मुलगी अनु ही जेवण करत नव्हती त्यामुळे तिची आई कोमल हिला राग आला आणि अनु जेवण करत नाही या कारणावरून तिने लाकडी काठीने अनुला हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली तसेच लोखंडी चमचा गरम करून अनुच्या हातावर, पायावर चटके दिले सदर क्रूरते मध्ये अनु आदित्य उत्तम वय ११ वर्षे रा. कारेगाव बाभूळसर रोड ता. शिरूर जि. पुणे ही बालिका जखमी झाली असून याबाबत स्नेहलता सर्जेराव यादव वय ५२ वर्षे रा. हुडको कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कोमल आदित्य उत्तम रा. कारेगाव बाभूळसर रोड ता. शिरूर जि. पुणे या आईवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार विद्या बनकर या करत आहे.
कु.ईश्वर दरवडे
रांजणगाव कारेगाव प्रतिनिधी
95274 78761