


चाकण ता.27 : चाकण तालुका खेड येथील जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल कडाचीवाडी शाळेतील विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात आपला डंका वाजवीत असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील बावीस विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. या निमित्ताने गुरुवार दिनांक 27 /7/ 2023 रोजी शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि कडाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावातील गणेश मंदिरात मुलांचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी मुलांना कौतुकाची थाप देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी नवनियुक्त पीएसआय मयूर पाटोळे साहेब , केंद्रप्रमुख श्री संदीप जाधव सर, मनशक्ती केंद्राचे श्री अजित फाफाळे , श्री मनीष शिंदे, पत्रकार श्री हरिदास कड, सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब कड, श्री मंगेश पऱ्हाड , श्री प्रभाकर कड तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सौ वैशालीताई विक्रांत चौधरी, श्री शामराव कड, श्री योगेशभाऊ नलावडे , संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कड सर रेस्क्यूवर विक्रांत चौधरी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली .
आयुष श्रीकांत साळवी (२५० गुण), पूर्वा अनंता राजगुरू (२४६ गुण), ओम सचिन धोत्रे ( २३६ गुण) या तिघांना शिष्यवृत्ती मिळाली. तसेच पृथ्वीराज विशाल पऱ्हाड (२२८ गुण) हा विद्यार्थी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत चमकला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री संकेत भिवरे सर, सौ वैशाली डोके आणि सौ. अश्विनी कात्रजकर यांचा पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ शुभांगी दत्तात्रय कड यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधी रामचंद्र पाटील