

दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणजेच वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक साजरा केला जातो. हा विशेष सप्ताह महिलांना स्तनपानाचे फायदे आणि गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. या वार्षिक महोत्सवात भारतासह १२० पेक्षा अधिक देश सहभागी होत आहेत.
याचेच औचित्य साधुन इनरव्हील क्लब of पुणे विंग्ज यांचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, शैल पिंपळगाव येथे गर्भवती व स्तनपान करणा-या महिलांसाठी ‘गरोदरपणात घ्यावयाचा आहार, कालाजी व स्तनापानाचे महत्त्व’ या अत्यंत महत्वाच्या विषयावर डॉ. मीनाताई जगताप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत डॉक्टरांनी उपस्थित महिलांना कोणत्या प्रकारचा आहार कोणत्या वेळी घेणे किती आवश्यक आहे याबाबत सखोल माहिती सांगितली.

यावेळी श्री गोवर्धन महिला विकास प्रतिष्ठान, पुणे याच्या संचालिका भाग्यश्री चौंडे यांनी गरोदर महिलांसाठी व स्तनपान करीत असलेल्या महिलांसाठी ख़ास बनविलेल्या औषधी कुकिजचे वितरण केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद, पुणे येथील आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी श्री. संदीप भुजबळ सर यांचे मार्गदर्शन व प्राथमिक आरोग्य केंद्र, शेल पिंपळगावच्या आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा व त्यांच्या सर्व सहका-यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या प्रेसिडेंट सुविधा, सेक्रेटरी उज्ज्वला, प्रमुख मार्गदर्शक डॉ. मीना व क्लब सदस्या अनीता, भाग्यश्री उपस्थित होत्या. |
पुणे जिल्हा परिषद पुणे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ रामचंद्र हंकारे यांचे मार्गदर्शनाने सदर कार्यक्रम राबविण्यात आला..
यावेळी पंचायत समिति खेड आरोग्य विभाग ,एकात्मिक बालविकास प्रकल्प खेड यांच्या पर्यवेक्षिका सौ आरती गोतमारे आणि सौ अनिता लांडे तसेच शेलपिंपळगाव येथील आरोग्य सहायिका ज्योती रणदिवे
आशा सुपरवायजर छाया इंगळे ,कुंदा गायकवाड,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवला