
विधानपरिषदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मा.आमदार सुरेश धस साहेब, मा.आमदार प्रवीण दटके साहेब आणि मा. आमदार सचिन आहेर साहेब यांनी श्री क्षेत्र निमगाव खंडोबाच्या विकास कामांसाठी तरांकित प्रश्न विचारून उपसभापतींचे लक्ष वेधले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीश महाजन साहेब यांनी प्रश्नाचे उत्तर देत असताना श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी 20 लाख आणि रस्त्यासाठी 45 लाख असे एकूण 65 लाख रुपयाचा निधी एक महिन्यामध्ये मंजूर करून देण्याचे आश्वासन विधानपरिषदे मध्ये दिले.
ह्या विकासकामांसाठी आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र मा.श्री.राजू खंडीजोड साहेब यांनी वारंवार पाठपुरावा केला याबद्दल त्यांचे श्री क्षेत्र निमगाव खंडोबाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार!!!
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र हे