
दावडी उपकेंद्र येथे स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला* दिनांक4/8/23 रोजी दावडी उपकेंद्र येथे स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहूने म्हणून विद्यमान सरपंच श्रीमती माधुरीताई खेसे, श्रीमती राणीताई डुंबरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती नोंदवली ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्तनपानाचे महत्त्व काय त्याचे फायदे माता आणि बालक यांना कशाप्रकारे होतात याची सविस्तर माहिती सोप्या शब्दात समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा अमित कोठ्रवार यांनी गरोदर माता आणि स्तनदा माता यांना दिली आईचे दूध हे बाळासाठी अमृता समान असते त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते बाळाचे वजन वाढण्यास मदत होते आणि बाळास हे पूर्णान्न आहे त्याचप्रमाणे स्तनपानामुळे आईचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते तसेच स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग यांच्यापासून बचाव होण्यास मदत होते तसेच गर्भाशयाचा वाढलेला आकार पूर्वत होण्यास मदत होते अशा प्रकारची संपूर्ण माहिती गरोदर माता आणि स्तनदा मातांना कार्यक्रमात अंतर्गत देण्यात आली …दावडी गावच्या सर्व आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांनी पोषक आहाराची सुंदर मांडणी केली होती.. प्रतिनिधी -मा.श्री.मनोहर गोरगल्ले