

अहमदनगर (नेवासा) त्रिमुती पब्लिक स्कुल येथे महाराष्ट्र थायबॅाक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेचे थायबॅाक्सिंग अजिंक्य पद स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत राज्यातुन चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत सेथ थॅामस स्कुल वाईच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन वयोगटात उल्लेखनिय यश प्राप्त केले.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील ६५ किलो वजन गटात वेदांत नवनाथ पडवळ याने सुवर्ण पदक प्राप्त केले.व १७ वर्षाखालील ६० किलो वजन गटात पार्थ उल्हास पानमंद याने रौप्य पदक प्राप्त केले. यांची हैद्राबाद तेलंगना येथे होणा-या राष्ट्रिय थायबॅाक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. या दोधांची सेथ थॅामस स्कुलचे मुख्याध्यापक ओशासने मॅडम व रुपेश सिंग सर यांनी अभिनंदन करुन पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अस्सल न्युज महाराष्ट्र करीता,
प्रतिनिधी
-विकास जांभुळकर