
संबंधित विभागातील अधिकार्यावर कार्यवाहिचे आदेश तसेच संयुक्त बैठकीचे आश्वासन रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्यानंतर उद्या दि.०९-०८-२०२३ आंदोलन मागे*.
क्रांतीदिन,बुधवार ०९ आँगस्ट २०२३ रोजी विविध मागण्यांसाठी जाहिर धरणे आंदोलन करण्यात येणार होते.पोलिस प्रशासन यांच्या मध्यस्थी ने रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडाची बोलावुन आंदोलन न करण्याची विनंती तहसिल प्रशासनाकडुन करण्यात आली रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या आंदोलन करण्याच्या ठाम भुमिकेमुळे संबंधित विभागातील अधिकार्याना तात्काळ कार्यवाहि करण्याचे आदेश तसेच पत्र पाठवण्यात आले.तसेच येत्त्या चार दिवसांत मा.तहसिलदार व रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक येत्या चार दिवसांत घेण्याचे आश्वासन श्री.मदन जोगदंड यांनी दिले.
यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय यावेळी संघटनेच्या वतिने घेण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळामधे प्रदेशाध्यक्ष मा.हरेशभाई देखणे,जिल्हाध्यक्ष मा.तुषार गायकवाड,अध्यक्ष भिमाशंकर रोपवे रस्ता कृती समिती मा.किसनराव गोपाळे,संघटनेचे कार्यकर्ते श्री.संतोष सुतार इ. उपस्थित होेते.