


महाराष्ट्र राज्य पदवीधर , प्राथमिक शिक्षक , केंद्रप्रमुख संघटना व महिला आघाडी आणि सहयोगी संघटनांच्या वतीने खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नीलकमल लॉन्स चांडोली या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे , खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील , पदवीधर संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे मा. राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत नायजेरिया देशातील ओजोमाह ग्लोरिआ इडेबो या शिक्षिका, गुणवंत शिक्षक दांपत्य सौ. सुवर्णा गणेश मिसाळ /तांदळे- गणेश मिसाळ यांच्या परदेशी पाहुण्या हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये पदवीधर संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक करताना मोहिते पाटलांनी वरील गौरवोद्गार काढले. यावेळी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक ठरलेले विद्यार्थी , इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये विशेष उल्लेखनीय गुण प्राप्त करणारे विद्यार्थी , शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शक शिक्षक , उच्च शिक्षणासाठी प्रवेशपात्र झालेले विद्यार्थी , विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य संपादन केलेल्या शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे , तालुकाध्यक्ष नारायण करपे , महिला आघाडी अध्यक्षा संजीवनी चिखले, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिनगारे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर दिघे ,तालुकाध्यक्ष दत्तात्रय बारणे ,जुनी पेन्शन संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी पवार , उपाध्यक्ष विशाल शिंदे , शिक्षक भारतीचे राज्य- उपाध्यक्ष बबनराव गावडे, तालुकाध्यक्ष संतोष कुंभार,शिक्षक समितीचे सरचिटणीस सुरेश आदक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव गायकवाड, दिनेश ठाकूर, दत्तात्रय भालचीम, मुगुटराव मोरे, सत्यवान लोखंडे, बाबाजी शिंदे, संदीप जाधव, अशोक सावंत, विलास पवळे, सतीश भालचिम , बंडू पगार, रविकिरण भोसले , सदानंद माळशिरसकर , मुरलीधर कोहिनकर , कल्याण पिंगळे , मधुकर गिलबिले , बाबाजी गायकवाड , मच्छिंद्र शेटे ,संतोष नेटके , महेंद्र गाडे , राजेंद्र मोधे , शामकांत बारणे , कुंडलिक सातकर , भाऊराव पांडे ,कोवीड योद्धे गणेश गोरे,साहिर शिकलगार , प्रणोती गावडे , रोहिणी गव्हाणे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख विजय सुरकुले, विठ्ठल सांगडे , एकनाथ लांघी , दत्तात्रय गोसावी सेवानिवृत्त विस्ताराधिकारी शांताराम मते , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुदाम वेहळे , शा. श्री. थिगळे त्याचबरोबर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम नेहेरे यांनी, सूत्रसंचालन तुषार वाटेकर , विशाल शिंदे , कल्याणी रामाणे, वर्षाराणी वाटेकर व शितल कड यांनी तर आभार नारायण करपे यांनी मानले
