


त्या अनुषंगाने चाकण शहरामध्ये आदर्श घनकचरा व्यवस्थापण प्रणाली स्थापन करण्यासाठी शहरातील 13 वॉर्ड मध्ये 90% पेक्षा अधिक स्त्रोत कचरा वर्गीकरण प्राप्त झाले. त्यासाठी सुका कचरा वर प्रक्रिया करण्यासाठी बाजार पेठेतील अमीर टॉकीजच्या मागील बाजूस खाजगी जागेवर MRF सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर, उपमुख्य अधिकारी सुनील बोरडे, नगर परिषदेचे सुपरवायझर विजय भोसले, मंगल गायकवाड मॅडम यांच्या हस्ते एम.आर.एफ सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्याच प्रमाणे कचरा वेचक भीमाबाई धनगर, साधना गुप्ता,सुमण गुप्ता यांना मुख्याधिकारी बल्लाळ सर यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.
उद्घाटन झाल्याबरोबर वार्ड क्र .०२ मधील घंटागाडी चा सुका कचरा शेडवर आणला व टिम लीड शिवाजी दामोदरे सर यांनी कचरा वेचकांना सुका कचरा कश्या प्रकारे शॉर्टिंग केला जातो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षीक दाखवले होते त्या प्रमाणे समजावुन सांगीतले त्या प्रमाणे कचरा वेचकांनीही कचरा शॉर्टिंग करण्यास सुरुवात केली यावेळी इंडिकेचे बनकर सर,शहर समन्वयक अभय मेंढे,क्लार्क भोंडवे सर,कारपे प्रतीनिधी शिवाजी दामोदरे,रेश्मा ढावरे उपस्थित होते.
