



श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण या प्रशालेमध्ये 8 ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद बिरसा मुंडा या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार श्रीमती कविता गोरे मॅडम प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता मंडलिक मॅडम सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांविषयी मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली असे वीर क्रांतिकारी यांची वेशभूषा करून विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले यावेळी प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र जाधव सर सांस्कृतिक विभाग प्रमुख संभाजी नाझीकर सर तसेच क्रांतिकारकांची माहिती व कार्यक्रमाचे आभार सुरेश पिंगळे सर यांनी मानले अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला